Monday, September 13, 2010

दिवस

दिवस



मंद निशा
उगवली उषा
दाही दिशा
फुलल्या आशा

अंगणो अंगणी
सडा टाकला
गायली गाणी
प्राजक्त फुलला

रहाटा रहाटा
घागर भर
जीवन माझे
जिवनाने भर

सूर्या सूर्या
अर्घ्य घे
तेज तुझे
मला दे

तुळशी तुळशी
पाणी घे
मला तुझे
सौभाग्य दे

चुली चुली
लिंपण लावते
कुंकवाचे बोट
तुला लावते

गायी गा्यी
चारा घ्या
वासराला
दूध द्या

धन्या धन्या
जागा हो
शेताची हाक
ऐकली काहो

दिसा दिसा
वाढत जाय
घरात माझ्या
लक्ष्मी जनलीहाय

बाळ गोपाल
झोळीत निजला
सुखाचा क्षण
हळूच टिपला

झाले सुरु
जीवन गाणे
देवकृपेने
काही न उणे

मुक्ता
10/2/2009

No comments:

Post a Comment