विरह.
पूनवेला तडागी फुलले पद्मकमळांचे कळे
आज आकाशी पुन्ह: उगवले नक्षत्रांचे मळे.
रान जळाले,पेटला वणवा , तव स्मृतींचा
धावत सुटलो,पदर उलगडीत मी काळाचा.
नाजुक पावले तुझी उमटली माझ्या हृदयावरी
दूर दूर, सूर पूर, पुन्हा उमलवली मंद पावरी
सखे,मिटवुनी ये आता त्या विरह कळ्याना
कायमचे मालवुनी टाक तू गतकाळ कळ्यांना
आर्तते बोलाविते माझी ही सुरेल पावरी
ये ना ग प्रिये लगबगे माझे साजण बावरी
लागतील चंद्र झळा प्रिये तुझ्या गालांना
पदर ओढून हळुच ये विरल्या वाटांना
गुंफुन टाकु चंद्रकलांना, बांधु यमुनेवरी झुला
नक्षत्रांची एक चांदणी करुनी देईन तुला.
नयनी तुझ्या पेरेन मी लाख सुरांचे थवे
मंजुळ गान गातच राहू रोज नव नवे
मथुरेला कृष्ण आल्यावरही कधी कधी गोकुळाची त्याला ओढ लागायची आणि त्याचे मन परत राधेसाठी झुरायचे
Mukta Pathak Sharma
६.२.२००९
सिंगापूर
No comments:
Post a Comment