Friday, September 3, 2010

अनिमा मुंडी (Anima Mundi)

.
.
.


उचल पावले फिर गरगर,
दारोदार नगर नगर.
नदी नाले वाहते निर्झर,
उंच उभ्या त्या गिरीवर.

चाल सरसर अथांग सरोवर.
या तनुवरुनी त्या तनुवर,
घेउनी पाठी सचेत कलेवर,
भटकत रहा या धरणीवर.

शोधीत रहा सदा निरंतर
क्षण क्षणिकांचे अंतर.
गळेल जेव्हा बाह्यांतर,
गुंजे एकनाद विश्वंभर.

Mukta

No comments:

Post a Comment