गाथा
रुधिराचा उष्ण घोट,
गटा गटा प्यायले.........
तेव्ह कुठे आतली आग,थोडीशीच शांत झाली
....हिमालयासारखी.
आणि मनाला जाणिव झाली,
.......समुद्राच्या रितेपणाची,
.......हिमालयाच्या थिटेपणाची.
आणि आपसुकच उमजली मला,
माझ्यातल्या उधाण वादळाची
बेफान लाटांची.........गाथा.
म्हणुनच म्हणते,
उगाच शांत दिसणा-या मला,
विचलीत करु नका...
हा सावधानतेचा इशाराच समजा.
....नाहितर
....जे आहे तेही गमवाल
.....मग विनाकारण दोष द्याल........माझ्या विध्वंसकारी रुपाला
..........................................आत दडलेल्या जगन्मातेला.
मुक्ता पाठक शर्मा
३१/३/२००८
No comments:
Post a Comment