रिंगण
टिपला सूर्य
भाळी रोवला
मदन सोहळा
भिने रोमारोमाती.
पेरला चांद
उगवला मळा
काळाची कळा
फिरे अवतीभवती
भंगला खेळ
संपला श्वास
विश्वाचा व्यास
फिरे परिघाभोवती
२६/५/२००९
ह्याच कवितेला वेगळे वळण
भंगला खेळ
संपला श्वास
विश्वाचा व्यास
भुलला परिघाभोवती
मुक्ता पाठक शर्मा
१५/८/२००९
No comments:
Post a Comment