सिकंदर
सकाळी उठता,
भगव्या सन्यस्त उषेची पूजा करता,
स्मरली कालची रात्र,
कळोखाच्या सागरात
फेकलेला दगड,
तळाशीच जाऊन निपचीत पडला असेल.
काळोखाचे आवरण घेऊन
काळोखातच हरवला असेल.
भगव्या उषेला काय खबर.
तिही अदृष्य होणार,
प्रखरता आल्यावर अरुणीची!!
त्याला कोणाची खबर,
"अंधाराचे साम्राज्य नष्ट करायला
निघालेला तो एक सिकंदर !"
- बंदीवान "पुरु" समोर हरणारा
......सपशेल हरणारा
मुक्ता पाठक
११.६.१९९९
No comments:
Post a Comment