हाक
विश्वाच्या व्यापकतेला ही क्षुद्राची हाक रे !
अथांग त्या दर्याला भुलली ही नाव रे !
भाळले त्या रंगाला अवनीचे ते अंग हे !
निळ्या गगनाला अजुनही अनंताचे खूळ रे !
कात टाकली, विज झेलली,विष प्याला रिचवला.
आसक्तीच्या मुळावरी अनासक्त हा रुजला.
फुलल्या दिशा,फुलल्या कला,आभाळाला भिडल्या
कणाकणातूनी अणु-रेणूतुनी विश्वरुपी जाहल्या.
मुक्ता पाठक शर्मा
३० मार्च २०१०
No comments:
Post a Comment