Thursday, September 9, 2010

नव कल्लोळ

नव कल्लोळ




कधीच विरघळल्या,निखळत्या वेदना.

नव्या आर्तस्वरासाठी तू गगनाला चाळतो?

*

काय सांगतील भेद ते तारे?

त्याना तरी काय ठाव आहे.

काय बोलेल तो चंद्र खुळा?

बोलण्यापरी त्या जवळी काय उरले आहे.

आभाळावरी कोणाची पावले रुतलेली,

येथीही ह्या भेदाचे गुढ रहस्य आहे.

*

सनातन,अचल स्वर्ग काय कामाचा?

तृषेच्या आगीत जळूनी पिघळतही नाही?

आनंदणे ज्यांना माहीतची नाही स्वच्छंदाचे

तो कल्पवृक्षही त्याना नरकासमान आहे.

*

शोधात प्रकाशाच्या चालला अंधाराच्या दिशेने.

मार्गात दिसतील कसे अनुभूतींचे नजारे?

एक घाव , तुकडे बंधनांचे,तराणे रोशणीचे.

तरी शोधात त्याच्या कुठे भटकत आहे.

*

गगनात नाही उरले काही,हे वास्तवाचे मर्म आहे.

नव्या स्वरांनी भरला कोष, तरी श्रवण द्वारे लुप्त आहे.

घडा फोडून वाहीली ती अमृत धारा.

तरी तृषार्तापरी नदीचा शोध आहे.

*

नवस्वराच्या साधका ! तलातल तोडूनी जा.

पावले पडतील ज्यावरी,निशाण तिथे सोडूनी जा.

नव्या झंकाराची दुनिया संपते कुठवरी?

तोच काही जाणतो,जो परिघाला मानत नाही.

*

काय आहे तिथे,जिथे कारंजे उधाणलेले,

जराशी भिजली माती की फुटती कोंब अंकुरलेले.

बरसतो जो गगनातुनी तेच जमा मही मध्ये,

उतरण्या अतलात अजुनही विचार विचलित आहे.

*

ह्रुदय जलात सिमटूनी,त्याचा ठाव घे,

रसाच्या तालात उतरुनी अवगाहन तर घे.

सरोवर सोडूनी,थेंब प्राशन मोदात रंगलेल्या मूढा,

गगनाच्या फुलावरी शायक वृथा संधानता आहे.



अवगाहन= स्नान किवा एकरुप होणे

शायक= बाण

मुक्ता पाठक शर्मा
२५/५/२००९

No comments:

Post a Comment