उंच उडोनिया जावे,
घ्यावे कवेत आकाश.
अंगावरी माखवावे
निल रंगास रंगास.
जरा घ्यावे हेलकावे.
वा-या संगे गावे गाणे.
गाण्यातही आभाळाला,
वा-यासंगे डोलवावे.
अशा अमूर्त क्षणाचा
स्पर्श अंगास अंगास.
सारे रंग चैतन्याचे
पेरेलेले आकाशात.
जरा बिजे रुजवावी
ऋतुमयी धरणीत.
आतुरले मन तिचे
नव्या संगास संगास.
नवा दिनु उगवला
नवे लेवून लावण्य.
हिरवाईच्या साथीला
आला धावून प्रकाश
धरत्रीच्या अंगणात
जन्म अंशास अंशास.
सा-या धरेवरी आली
एक आनंदाची लाट
भेटे धरणीला आज
ऋतु वसंताची वाट
तिच्या अंगी मोहरला
रंग पलाश पलाश
मुक्ता शर्मा
31/3/2009
No comments:
Post a Comment