Tuesday, September 7, 2010

संपाति

संपाति


.
तुला मी कधीच दोष दिला नाही.


आजही नाही, कालही नाही

आणि उद्याही देणार नाही.

सा-या चूकांचे खापर माझ्याच माथी रोवलय मी



हा माझाच कसूर होता

कि सूर्याच्या घोड्यांशी शर्यत लावुन

मी आकाशात उडालो



जटायु माझ्या पेक्षा हुशार निघाला,

तो अर्ध्यातुनच मागे फिरला.



मी मात्र अहंकाराच्या गुर्मीत

उडत राहिलो.

आणि जसा सूर्याजवळ पोहचलो,

माझे पंख राख झाले.



मी पाणी मागितले

पण दूर आकाशी

पाणी कोण देणार?





सूर्याने मारलेल्याला

आपला शरणागत

कोण करतो?



आता तर सगळं सोडून

तुझ्या चरणी पडलो आहे.

मंदिराबाहेरच्या पायवाटेसमान

तुझ्याच अंगाणात चेतनाच्या शोधात अचेतन...



तुला काहीच दोष देत नाही ...

‘‘आमि आपन दोषे दुख पाइ

वासना-अनुगामी।’’



मुक्ता पाठक शर्मा
२८/५/२००९

No comments:

Post a Comment